Saturday 29 October 2011

भटके मन

भटके मन -

कधी हे दूर आकाशात
 तर कधी हे आकाशाच्या पलीकडे असलेल्या जगात.
कधी हे माझ्या मनात 
तर कधी हे मनाच्या खोलात.

मना मध्ये कधी येतं  पूर्णतः नागडे होवून 
जगासमोर जावं आणि ओरडावं. 
पण दुसर्याच क्षणी वाटते कि लाजेमध्ये  लपून जावून 
मना मधले सर्व अडचणी,सुख दुखं, भय
हे एका कोपऱ्यात जपून ठेवावं.

 एकटे असते तेव्हा त्याला भाठ्काव्न खूप कठीण 
आणि जेव्हा भटके असते तेव्हा  त्याला एक्ठ ठेवणं हि कठीण 

 मनाला मी समजण्याचा खूप साहस  केले, 
पण जसा जसा मी  ह्याचा जवळ गेलो तसे तसे हे दूर जावू लागले.


मनाला प्रश्नांचं उत्तर विचारले  
उत्तर मात्र मिळाले पण 
प्रश्नाचं  अर्थच  विसरलो
प्रश्नाची गरज विसरून गेलो
भटक्या मनाचा पाठलाग करता करता 
आता मी ही भटक्या जमाती  सारखा झालो
शैनिक सुखाचा विचार करून
फक्त आजचाच विचार करून
पुढच्या रस्त्याचा शोध लावण्यास विसरलो

पण आता चूक समजून आली
आणि पुन्हा एकदा ह्या भटक्या मनाचा शोध लावण्यास सुरुवात केली 
पण बरे...  एवढ्या या धाकधुकीत ह्या
 भटक्या मनात ती मात्र रुजून बसली,
ह्या मनानी तिच्या मनाला जागा दिली.

जर तिच्याहून हे भटके मन भटकले असते
 तर ह्या मनाच्या मालकाचं  व्यक्तिमत्वच हरवलं असतं.
हे  व्यक्तिमत्व जे तीच्य्पासूनच  घडले
त्या व्यक्तिमत्वाचा अर्थच उरलं नसतं.

 पण जेव्हा असते दुख तेव्हा भटकणे गरजेचे
आणि  जेव्हा सुख तेव्हा स्थिर राहणे गरजेचे

 जसं ह्या आयुष्याचा चक्र स्थिर ठेवणं कठीण
तसे ह्या भटक्या मनाला स्थिर ठेवणं कठीण


पण जगाच्या परंपरे नुसार प्रयत्नं केलेच पाहिजे.
आखरी श्वासा पर्यंत लढले पाहिजे.
आयुष्यं आणि भटक्या मनाचं चक्र  स्थिर ठेवण्याचे  नाटक केलेच पाहिजे.

                                                                                                                जितेंद्र  प्रकाश डोंगरे